शिक्षणावर लोन हवंय ( Educational Loan): शिक्षणावर लोन कसं काढायचं,आणि किती पर्यंत लोन भेटू शकत?

 

Educational-Loan-Updates

प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले तरी केवळ अँडमिशन फी भरता येत नाही म्हणून शिकणं सोडून द्यावं लागतं, अशी तक्रार अनेक विद्यार्थी करतात. आता मात्र एज्युकेशन लोन अर्थात शैक्षणिक कर्ज घेऊनही या समस्येतून वाट काढता येऊ शकते. या कर्जात अभ्यासक्रमाच्या फीसह अगदी हॉस्टेलच्या फीपर्यंतचा खर्च एज्युकेशन लोनअंतर्गत बँकेकडून घेता येऊ शकतो. दरवर्षी पास होत राहिलं तर बँक पुढच्या शिक्षणासाठीही कर्ज देत राहते.

कसं काढायचं शैक्षणिक कर्ज:
प्रत्येक बँकेच्या शाखेत कर्ज पुरवठा विभाग असतो. तेथे शैक्षणिक कर्जाची सर्व माहिती मिळू शकते. त्यामुळे जाऊन थेट बॅँक मॅनेजरला भेटा. हे कर्ज विद्यार्थ्याला मिळत नाही तर पालकांना हमीदार/सहकर्जदार म्हणून जबाबदारी घ्यावी लागते.तसेच काही ठिकाणी ‘तारण’ही ठेवावं लागतं. त्यात घर, जमीन, एलआयसीची पॉलिसी, एखादं पालकांचं फिक्स डिपॉझिटही तारण ठेवता येऊ शकतं. सहसा चार लाखांपर्यंतच्या ( 4 lac)कर्जाला तारण ठेवावं लागत नाही.
कोणकोणत्या बँका कर्ज देऊ शकतात? 
सर्व राष्ट्रीयीकृत, काही खासगी तसेच काही नागरी बँका शैक्षणिक कर्ज देतात. परंतु राष्ट्रिय बँकेतून कर्ज घेतलेलं योग्य ठरतं. त्यासाठी थेट जवळच्या बॅँक मॅनेजरशी संपर्क साधावा.
किती पर्यंत एज्युकेशन लोन काढू शकतो?
* भारतात शिक्षणासाठी साधारणपणो दहा लाखांपर्यत( 10 Lac) कर्ज मिळतं.
* भारतात शिक्षण घेण्यासाठी एकूण कर्जाच्या 4 lac(चार लाखांपेक्षा अधिक कर्ज असेल तर) पाच टक्के( 5%) रक्कम शिक्षणसंस्थेत भरावी लागते, उर्वरित रकमेचं कर्ज मिळतं.
* परदेशात शिक्षणासाठी कर्ज मिळतं. ते कोर्सप्रमाणे वेगळं असू शकतं.
* चार लाखांवरील ( 4 lac)कर्जासाठी घर किंवा जमीन तारण ठेवावी लागते. घर/जमिनीचे बँकेकडून मूल्यांकन केलं जातं, त्यानुसार कर्ज मिळतं.
कोणकोण हे लोन काढू शकत?
बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकलसह इतर व्यावसायिक शिक्षणासाठी कर्ज मिळतं.
पदवीनंतर सर्व प्रकारच्या उच्चशिक्षणासाठी कर्ज घेता येतं.
 उच्चशिक्षणानंतर संशोधनासाठी कर्ज मिळते.
हमीदार:
 पालक किंवा नातेवाइक, भाऊ-बहीण गॅरेंटर (हमीदार) किंवा सहकर्जदार असतात. पालकांना उत्पन्नाची माहिती द्यावी लागते. कर्ज फेडण्याची हमी द्यावी लागते. 
आवश्यक कागदपत्रे ?

:
 शैक्षणिक प्रमाणपत्रं .
ज्या कोर्सेस साठी लोन हवंय त्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं पत्र. (जीआरई/जीमॅट/टोफेल/आयएलईटीएस/सीईटी/कॅट)
 संबंधित अभ्यासक्रमाला शासकीय मान्यता हवी. (यूजीसी/एआयसीटीई/आयसीएमआर)
 प्रतिज्ञापत्र.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचं पत्र.
 फीचं संपूर्ण विवरण (सत्ननुसार)
प्रवेश फी भरली असल्यास त्याची पावती.
आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र.
कशी करावी कर्जफेड?

* शिक्षण संपल्यानंतर एक वर्ष किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिने यापैकी जी तारीख आधी असेल, तेव्हापासून कर्जफेड करण्यास सुरुवात करावी लागते.
* पाच वर्षात कर्ज फेडावं लागतं. कर्जफेडीच्या मुदतीत वाढ करून देण्याचा विचार केला जाऊ शकतो.
* शिक्षणाच्या काळात मुद्दल न भरता फक्त व्याज भरण्यास सुरु वात करता येते.
* कर्ज फेडलं नाही तर ते पालक किंवा हमीदार यांच्याकडून वसूल होतं आणि त्यामुळे डिफॉल्टर म्हणून खटलाही बॅँक दाखल करू शकते.
अधिक माहितीसाठी या पोर्टल वर जाणे:
https://www.vidyalakshmi.co.in/Students/
या पोर्टलवर विद्यार्थ्याला स्वत:ला रजिस्टर करावं लागतं. त्यातून त्यांना एक आयडी, पासवर्ड मिळतो.
एज्युकेशन लोनचा फॉर्म मिळतो. त्यासोबत ओळखपत्र, मातापितांचे आयटी रिटर्न आणि मार्कशिट, कुठं प्रवेश घेतला हेही सादर करावं लागतं.
विशेष म्हणजे नो युवर कॉलेज या सुविधेंतर्गत आपलं कॉलेज खरोखरच मान्यताप्राप्त आहे, फी योग्य घेत आहे, अभ्यासक्रमाला मान्यता आहे की नाही हे ही कळतं.
कर्ज मंजूर झाल्याची किंवा न झाल्याची माहितीही याच पोर्टलद्वारे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विशिष्ट मुदतीत मिळते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *